PUNE KHARADI RAVE PARTY: पुण्यातील ‘रेव्ह पार्टी’वर रेड; एकनाथ खडसेंच्या जावयासह सहा जण ताब्यात

33 0

PUNE KHARADI RAVE PARTY: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. (PUNE KHARADI RAVE PARTY)

खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

खडसेंचा जावई या आधीही आला होता चर्चेत

एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलवलकर या आधीही एका कारणासाठी चर्चेत आले होतेयात खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची एमएच 19 एक्यू 7800 ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता.

जावयाला ताब्यात घेतल्यानंतर काय म्हणाले एकनाथ खडसे

दरम्यान या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी “यासंदर्भातील माहिती मला तुमच्याकडूनच मिळते आहे आणि हे होणारच होते, हे मला आधीच माहीत होते,” असे सांगत खडसे यांनी या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो.”

 

एकनाथ खडसे यांनी याप्रकरणात स्थानिक पोलिस तपास करणार नसल्याचा संशयही व्यक्त केला. “स्थानिक पोलिस दबावाखाली असू शकतात. दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, पण मला संपूर्ण माहिती मिळाल्यावरच स्पष्टपणे बोलणे शक्य आहे,” असे ते म्हणाले. “जो दोषी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण जर हे षड्यंत्र असेल, तर तेही समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे

Share This News
error: Content is protected !!