PUNE KATRAJ NEWS: पुण्यातील कात्रज परिसरातून अपहरण झालेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा शोध अखेर लागलाय!
पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे धाराशिव जिल्ह्यातून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून, अपहरण करणाऱ्या
भिक मागायला लावणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला..
VIDEO NEWS: Bala बांगर नंतर Shivraj बांगर | Walmik Karad च्या पापाचा ढासळणार डोंगर! Munde | Andhale | Parli
दिनांक 25 जुलै… रात्रीची वेळ संपूर्ण पुणे शांत झोपलं होतं..
कात्रज परिसरातील वंडर सिटी झोपडपट्टीमध्ये धनसिंग काळे आपल्या कुटुंबा समावेश शांत झोपले होते..
धनसिंग काळे यांना चार मुले आहेत… त्यात दोन वर्षाच्या दोन जुळ्या मुली… या दोन्ही जोड्या मुली आपल्या वडिलांसोबत शांत झोपल्या होत्या…
अचानक मध्यरात्री धनसिंग काळे यांना जाग आली.. आणि ते बघतात तर काय.. त्यांना त्यांची एक जुळी मुलगी दिसेनाशी झाली.. त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली..
पण कुठेच त्यांची दोन वर्षाची चिमुकली दिसली नाही.. बापाचं काळीज आपल्या मुलीला शोधण्यासाठी सैरभैर झालं..
त्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्या लाडाच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झालं…
आणि त्यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल केला…
आणि सुरू झाला अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला शोधण्याचा प्रवास.. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली..
पोलिसांना तपासा दरम्यान वंडर सिटी परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये तिघेजण चिमुरडीला दुचाकीवरून घेऊन जात असल्याचं दिसून आलं..
LATUR COVID GIRL NEWS: अंध मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
पोलिसांना हिंट मिळाल्यानंतर पोलिसांनी कात्रज ते पुणे स्टेशन परिसरापर्यंतचे 140 सीसीटीव्ही कॅमेरे पडता आले तेव्हा समोर आलं धक्कादायक वास्तव..
तपासादरम्यान वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्हीत दुचाकीवर तिघेजण या चिमुरडीला घेऊन जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे 1-2 नव्हे तब्बल
140 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या तिघांव्यतिरिक्त आणखी दोघे असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींची ओळख पटवून माहिती घेतली असता सर्वजण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी असल्याची माहिती भारती विद्यापीठ तपास पथकाला मिळाली.
PUNIT BALAN GROUP: पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय; सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्पेशल ऑपरेशन’ तयार होतं…
पोलिस अधिकारी राहुल खिलारे आणि स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक रेल्वे, CCTV, आणि मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतं…
आणि शेवटी… मिळतो एक ‘ब्लास्टिंग क्लू’ – धाराशिव जिल्ह्यातील डिकमाळ पारधी वस्ती! पोलीस रात्रीच्या अंधारात
धाराशिव जिल्ह्यातील डिकमाळ पारधी वस्तीत शिरतात तिथे दोन वर्षाची अपहरण झालेली मुलगी एका झोपडीत दिसते…या कारवाईत पोलिसांनी सुनील सीताराम भोसले (५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, जिल्हा धाराशीव), शंकर उजन्या पवार (५० वर्षे) शालुबाई प्रकाश काळे (४५ वर्षे), गणेश बाबू पवार (३५ वर्षे, तिघेही रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापूर, धाराशिव) तसेच मंगल हरफूल काळे, (१९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाइनझोपडपट्टी, खडकी) यांना अटक केली.. आणि भीक मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला…
भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव पोलिसांच्या मदतीने या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आणि या दोन वर्षांच्या मुलीला सुद्धा तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.तुळजापूर येथील आरोपी हे पूर्वीही अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी शहरांमध्ये फिरून बालकांचे अपहरण करून त्यांना भीक मागण्यासाठी भाग पाडल्याचे उघड झाले आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.