पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग च्या जमीन विक्रीचा व्यवहार अखेर बिल्डर विशाल गोखलेंकडून रद्द करण्यात आला असून त्यांनी ट्रस्टला तसा मेल पाठवला आहे.
नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग भेट देऊन सकारात्मक मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शनला व्यवहार रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे
आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील जैन मुनि संस्था संघटना यांची बैठक झाली होती या बैठकीनंतर राजू शेट्टी आणि मुरलीधर मोहोळ यांची चर्चा देखील झाली. स्वतः राजू शेट्टी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बिल्डरकडून व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली.