Vishal Agrawal

PUNE ACCIDENT BREAKING NEWS: ब्रह्मा रियालिटी चे संचालक विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील अनधिकृत रिसॉर्ट सील

577 0

पुण्याच्या कल्याणी नगर मध्ये 19 मे रोजी घडलेल्या पोर्षे कार अपघातानंतर रोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता अल्पवयीन कारचालक आरोपी वेदांत अग्रवाल चे वडील ब्रम्हा रियालिटीचे संचालक विशाल अगरवाल याच महाबळेश्वरमधील अनधिकृत हॉटेलवर महाबळेश्वर नगरपालिका आणि सातारा जिल्हा प्रशासनाने कारवाई करत सील केलं आहे

१९ मेच्या मध्यरात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत कल्याणीनगर येथए एका बाईकला धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्याला अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. तसेच पोलिसस स्टेशनमध्येही त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नागरिक संतापले, समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त झाला.

त्यानंतर याप्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करताना पुणे पोलिसांनी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आधीच कोठडीत आहेत. तर आता त्याची आईदेखील पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!