राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर भाजपही विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असून शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमीगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
याबरोबरच नव्याने मान्यता मिळालेल्या स्वारगेट ते कात्रज पर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याची शक्यता आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय..