नवी दिल्ली: आज भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केला आहे.
सलग अकरा वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं असून सशक्त राष्ट्रासाठी काम करत राहणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी भाषणातून सांगितला आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देश प्रथम ही संकल्पना घेऊन आमचं काम हे अव्याहतपणे सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास वाढला असून मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक भारतात होत आहे. यासोबतच तब्बल अडीच कोटी घरापर्यंत वीज पोहोचली असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.