चलनी नोटांवर हवा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो; भाजपा आमदार नितेश राणेंनी ट्विट केला फोटो

227 0

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे.

देशाच्या प्रगतीसाठी देवी लक्ष्मीचा आणि गणपतीचा फोटो भारतीय चलनावर लावण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. नव्या नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.
त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली 200 रुपयांची नोटही अपलोड केली आहे. त्यात त्यांनी यह फरफेक्ट है असे म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!