मोठी बातमी! राज्यात 5 रुपयांनी पेट्रोल आणि 3 रुपयांनी डिझेल होणार स्वस्त

314 0

मुंबई: राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला असून राज्यात  एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद देऊन दिली आहे.

त्याच बरोबर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 रुपयांचे आर्थिक अनुदान देखील देण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या लस अर्थात बूस्टर डोस 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना मोफत देण्याची घोषणा देखील करण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!