विद्यापीठ परिसरात विकृत कृत्य: विद्यार्थिनींकडून ठिय्या आंदोलन

518 0

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एका कर्मचाऱ्याने विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार करण्यासाठी कुलगुरू व कुलसचिवांकडे धाव घेतली असता, त्यांच्याकडून उलट झापण्यात आल्याचा आरोप आहे. विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात सुमारे ३० ते ४० विद्यार्थिनी सहभागी असून, संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!