पेशावर- पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत आज शुक्रवारी झालेल्या स्फोटात ३० जण ठार झाले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी जिओ न्यूजनुसार, जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सांगितले की, पेशावरच्या जुन्या शहरातील कुचा रिसालदार मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी लोक जमले असताना हा स्फोट झाला.
पेशावरचे सीसीपीओ (कॅपिटल सिटी पोलिस ऑफिसर) इजाज अहसान यांनी या स्फोटात एका पोलिसाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी केली. प्राथमिक अहवालानुसार, दोन हल्लेखोरांनी शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला, असे सीसीपीओने सांगितले. यात एक पोलिस ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. सीसीपीओने सांगितले की, हल्ल्यानंतर मशिदीत लोकांना लक्ष्य करण्यात आले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक प्रचंड घाबरले आहेत.
आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. साक्षीदारांपैकी एक शायन हैदर हा देखील मशिदीत प्रवेश करत असताना मोठा स्फोट झाला. तो म्हणाला, ‘मी माझे डोळे उघडले तर सर्वत्र धूळ आणि मृतदेह पसरलेले होते.