OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

3209 0

भारताकडून पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर OPERATION SINDOOR सुरू असून त्याच जोडीने आता ऑपरेशन सीड OPERATION SEED देखील चालू झालं आहे.

हे ऑपरेशन पूर्वीपासून युद्ध दरम्यान राबवला जातं. मात्र हे ऑपरेशन सीड नेमकं आहे तरी काय ? आणि याचा भारताला नेमका कसा फायदा होत आहे पाहूया…

दुसऱ्या महायुद्धातील रणनीती “ऑपरेशन सिंदूर”नंतर आता “ऑपरेशन सीड” नेमकं आहे काय ?

भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या लाहोर मध्ये असलेला एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला केला.

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यात आले. यात अर्ध्याच्या वर पाकिस्तान उध्वस्त झाला. मात्र तरीही शांत न राहता पाकिस्तान कडून कुरघोड्या सुरू करण्यात आल्या.

सीमापार Operation Sindoor मात्र TV Channels च्या Studio तून खोट्या बातम्यांचा धूर!

शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं भारतीय सीमेवर गोळीबार केला. यामध्ये 12 पेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू झाला. त्यावरही भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर पुन्हा पाकिस्तान कडून भारतावर हवाई हल्ले सुरू करण्यात आले.

त्यावेळी मात्र भारताने सर्व क्षमता लावत पाकिस्तानची मिसाईल हवेतल्या हवेतच उडवली. पाकिस्तानचे 45 मिसाईल आणि साठ ड्रोन भारताने पाडले.

शत्रूची रडार सिस्टीम आणि एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करून हवेतल्या हवेतच शत्रूचे मारे रोखणं यालाच लष्करी भाषेत ऑपरेशन सीड म्हटलं जातं.

या ऑपरेशनमुळे बाकी शत्रू राष्ट्राची ताकद कमी होते. शस्त्रास्त्र कमी होतात त्यानंतर शत्रुराष्ट्रावर थेट हल्ला केला जातो अर्थात थेट युद्ध पुकारलं जातो.

अशा पद्धतीच्या सीड ऑपरेशनचा अमेरिकेला चांगला अनुभव आहे. पाकिस्ताननं काल भारताच्या 15 लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र आपल्या एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचं एच क्यू 9 या डिफेन्स सिस्टीमला उध्वस्त केलं.

त्यानंतर हल्ला करण्यासाठी डागलेलं पाकिस्तानचं एफ 16 हे विमान भारताने राजस्थानमध्ये पाडलं.

त्यातून पाकिस्तानच्या दोन वैमानिकांना ताब्यात घेतलं.

याच पद्धतीने हवाई मिसाईलच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणं आणि हवाई हल्ले रोखणं यालाच सीड ऑपरेशन म्हणतात.

सीड ऑपरेशनचा पहिला प्रयत्न दुसऱ्या महायुद्धा वेळी करण्यात आला होता. शत्रूंची लढाऊ विमान शोधून ती नष्ट करण्याचा प्रयत्न ब्रिटिश हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी केला होता.

त्यामुळेच ब्रिटनने जर्मनीला हरवण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेकदा विविध राष्ट्रांनी युद्ध दरम्यान ऑपरेशन सीड राबवलं आहे. शत्रुराष्ट्रात प्रवेश न करता हवेतल्या हवेत मिसाईल पाडल्याने शत्रूंची ताकद कमी होते.

त्यामुळे भविष्यात होणारे युद्धात वरचढ ठरता येतं. त्याच पद्धतीने आपल्या राष्ट्राचं संरक्षण देखील चांगल्या पद्धतीने करता येतं. ऑपरेशन सीड हे सध्या भारताकडून देखील राबवलं जात आहे.

त्याचाच अंतर्गत पाकिस्तानची लढाऊ विमान आणि मिसाईल हवेतला हवेत उडवली जात आहेत.

JAYKUMAR RAWAL: काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY

Share This News
error: Content is protected !!