Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत (Onion Export ) एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. लोकसभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कांदा UAE, मॉरिशस, भूतान, बाहरीन, श्रीलंका, बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.
