MVA: महाविकास आघाडीतून 'हा' पक्ष पडणार बाहेर; अजित पवार यांच्या जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

MVA: महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष पडणार बाहेर; अजित पवार यांच्या जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

156 0

MVA: महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मात्र निकालापूर्वीच सत्तेत येण्यासाठी नवी समीकरणं बनवण्याबाबत महायुती, महाविकास आघाडी मध्ये चर्चा चालू झाल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांच्या जवळच्या व्यक्तीने एक धक्कादायक विधान केलं आहे. महिनाभरात महाविकास आघाडी सोडून लवकरच एक पक्ष महायुतीत सामील होईल, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला आहे.

महाविकास आघाडी फुटणार ?

सुरज चव्हाण यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर या संदर्भातली सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुरज चव्हाण म्हणतात, ‘महाविकास आघाडीच्या नेत्याकडून संजय राऊत आणि नाना पटोले मारामारी करून घेऊ नये म्हणून खबदरदारी घेत नाना पटोले यांना जाणीवपूर्वक मिटिंग पासून दूर ठेवत आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्याकडून सध्या वांझोट्या बैठका चालू आहेत. महिनाभरात महाविकास आघाडी सोडून लवकरच एक पक्ष महायुतीत सामील होईल.’ या पोस्टमध्ये त्यांनी पडद्यामागे अशा प्रकारच्या हालचाली चालू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता मविआतून बाहेर पडणारा अपक्ष कोणता असेल, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महायुती 160 जागा जिंकणार ?

सुरज चव्हाण यांनी काल आलेल्या एक्झिट पोलवर देखील आपलं मत व्यक्त केलं होतं. एक्स प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट केली आहे की, ‘महाराष्ट्रात एक्झिट पोल काहीही असले तरी जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. 23 नोव्हेंबरला महायुतीच्या 160 सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नेमकं बहुमत कोणाला मिळणार ? याकडे राज्यातील सर्वच नेतेमंडळींचं लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!