मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव

264 0

नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे.अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

अशातच आता महाविकास आघाडीने राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंबंधीचे पत्र मविआच्या नेत्यांनी विधानसभा सचिवांना दिले आहे. त्यामुळे आता यावर विधानसभा सचिव काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचं हे पत्र दिलं. या पत्रावर महाविकासआघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक असताना महाविकासआघाडीने घेतलेल्या या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे.

Share This News
error: Content is protected !!