कणकवली- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दिलासा दिला आहे. नितेश राणे यांची 30 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
नितेश राणे यांना सुनावण्यात आलेली दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली. न्यायालयाने त्यांची मागणी ग्राह्य धरून राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी नितेश राणे यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
राणे यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आज निर्णय दिला आहे. राणे यांची 30 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.