NILESH CHAVAN वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला फरार निलेश चव्हाण याला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथक काम करत असताना चव्हाणला पकडून ठेवलं आहे.

NILESH CHAVAN: ‘निलेश चव्हाण सापडलाय, त्याला गाडीत पकडून ठेवलंय’ पोलिसांना फोन आला अन् पुढे भयंकर घडलं?

595 0

NILESH CHAVAN वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला फरार निलेश चव्हाण याला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथक काम करत असताना चव्हाणला पकडून ठेवलं आहे.

त्याच्याकडे दोन पिस्तूल ही सापडलेत, असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र फोन कॉल नंतर पोलिसांची तारांबळ उडाली. NILESH CHAVAN

TOP NEWS MARATHI | VAISHNAVI HAGWANE : NILESH CHAVAN सापडल्याचा नांदेड सिटी पोलिसांना बनावट फोन
अनेक दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाण याला शोधण्यासाठी पोलिसांची आठ पथक काम करत आहेत.

राज्यात, राज्यात बाहेर आणि तो देश सोडून जाऊ नये असा सगळ्यात स्तरावरती तपास पथकं तपास करत आहेत.

मात्र असं असतानाच नुकताच पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांना एक फोन आला ज्यावरून निलेश चव्हाण आपल्याकडे असल्याचे माहिती सांगण्यात आली.

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा

फरार आरोपी निलेश चव्हाण याला आम्ही पकडून ठेवलं आहे.

त्याच्याकडे दोन पिस्तूलं सापडली आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत बंद करून ठेवलं आहे.

VAISHNAVI HAGWANE CASE: सासू, नणंद आणि नवऱ्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?

असं या व्यक्तीने आपत्कालीन नंबर असलेल्या 112 क्रमांकावर फोन करून सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं मात्र तिथे काहीच आढळलं नाही.

हा फोन करणारा व्यक्ती पानशेत येथील स्वागत हॉटेल परिसरात पोलिसांना सापडला. संतोष दत्तात्रय गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून त्याने बनावट फोन केल्याची कबुली दिली.

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

Share This News
error: Content is protected !!