स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

196 0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ला नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, “आज भारताचा राष्ट्रध्वज जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. नवीन संकल्प आणि नव्या जोमानं पावलं उचलण्याचा आजचा दिवस आहे.

https://youtu.be/44t9cFd27lM

गुलामगिरीचा संपूर्ण काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला आहे. भारताचा असा एकही कोपरा नाही, जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. असा एकही भाग नाही जिथे, लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं नाही, त्याग केला नाही. आज सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे.”

Share This News
error: Content is protected !!