VIDEO VIRAL : सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका व्हायरल व्हिडिओ वरून ते युजर्सच्या ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत. हा व्हिडिओ आहे मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमधला… या मध्ये आपण पाहू शकतो की नाना पटोले हे एका महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसले आहेत. यावरूनच युजर्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
दरम्यान या व्हिडिओ विषयी नाना पटोले यांना विचारले असता,”हे भाजपचे कटकारस्थान असल्याचा थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तर या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्यासही त्यांनी म्हटले आहे.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) July 20, 2022
हा व्हिडिओ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देखील दिले आहे. कॅप्शन मध्ये चित्रा वाघ म्हणतात की,“काय नाना… ,तुम्ही पण झाडी,डोंगर आणि हाटिलीत …! अशा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान या व्हिडिओ प्रकरणावरून चित्रा वाघ यांना देखील युझर्सनि धारेवर धरले आहे. चित्रा वाघ या देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसून येते आहे. नाना पटोले यांचा हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मला धक्का बसला असे चित्रा वाघ म्हणतात, परंतु हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून यामागे भाजपचेच कटकारस्थान असल्याचे नाना पटोले यांचे म्हणणे आहे.