Nagpur Accident

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

518 0

नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. नागपूरमधून (Nagpur Accident) अशीच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी व्यक्तीला तातडीने स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रक आणि कार यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. हे सर्व जण लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

काय घडलं नेमके?
ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांनी आपला जीव गमावला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेय. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व जण एकाच गावातील आहेत. ते मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. लग्न समारंभ आटोपून परत जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्खा चुलत भावांचा समावेश आहे.हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही.

अजय दशरथ चिखले (वय 45), विठ्ठल दिगांबर धोटे (वय 45), सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42), रमेश हेलोंडे (वय 48), मयूर इंगळे आणि वैभव साहेबराव चिखले (सर्व राहणार मेंढेपठार बाजार) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मृतांमध्ये अजय चिखले आणि वैभव चिखले हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. तर जगदीश ढोणे (वय 40) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे मेंढेपठार बाजार गावावर शोककळा पसरली आहे. नागपूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sandeep Kshirsagar : ‘माझं घर जळत होतं अन्’…; आमदार संदीप क्षीरसागरांनी गंभीर आरोप करत सांगितला ‘त्या’ घटनेचा संपूर्ण घटनाक्रम

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Pune Crime News : खळबळजनक ! केस पडल्याच्या रागातून जावयाकडून सासूवर प्राणघातक हल्ला

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!