BMC ELECTION 2026 : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)
१५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे. २२७ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत
यंदा केवळ रॅली किंवा सभांचेच मैदान गाजत नसून, ‘डिजिटल वॉर’मध्ये भारतीय जनता पक्षाने
आपल्या विरोधकांना कित्येक मैल मागे टाकल्याचे चित्र दिसत आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, ‘मार्व्हल’ सिनेमॅटिक युनिव्हर्सचा कल्पक वापर आणि आक्रमक नरेटिव्हच्या जोरावर
भाजपने मुंबईच्या तरुण मतदारांच्या मनावर गारूड घातले आहे.
‘मार्व्हल’ अवतारात भाजपचा प्रचार: तरुणाईमध्ये ‘क्रेझ’
यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे भाजपचे ‘एआय’ (AI) जनरेटेड व्हिडिओ कॅम्पेन.
टोनी स्टार्क (आयर्न मॅन), थानोस, स्पायडरमॅन आणि हल्क यांसारख्या
जगप्रसिद्ध पात्रांना चक्क मुंबईच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपने प्रचाराची व्याख्याच बदलून टाकली आहे.
हे सुपरहिरोज मुंबईच्या विकासावर आणि समस्यांवर भाष्य करताना दिसत असल्याने
सोशल मीडियावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
BMC ELECTION: मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?
विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील मतदारांमध्ये
या कल्पकतेमुळे भाजपबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली आहे.
काँग्रेससारख्या पक्षांनीही या ट्रेंडचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला,
मात्र तांत्रिक अचूकता आणि संदेशाची स्पष्टता यामुळे भाजप या शर्यतीत ‘एंडगेम’च्या फायनल टचपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे
‘मुंबई आता थांबणार नाही’: एक भक्कम व्हिज्युअल ओळख
भाजपने केवळ मनोरंजनावर भर न देता “त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही” या घोषणेद्वारे मतदारांना एक खंबीर पर्याय दिला आहे.
ही घोषणा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता, ती प्रत्येक बॅनर, पोस्टर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकसमान पद्धतीने मांडली जात आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेच्या (UBT) जुन्या रेडिओ जाहिरातींचा संदर्भ घेत भाजपने त्यांचाच संदेश त्यांच्यावर उलटवण्याची जी रणनीती आखली आहे,
त्यामुळे विरोधक बॅकफूटवर गेले आहेत.
विरोधकांचे ‘श्रेयवादाचे’ राजकारण आणि मतदारांची शंका
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) प्रामुख्याने ‘कोस्टल रोड’सारख्या प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र, मुंबईच्या सुजाण मतदारांमध्ये या दाव्यांबाबत मोठी साशंकता आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रकल्प आणि
मागील प्रशासनाच्या काळातील कामांचे श्रेय लाटण्याच्या या धडपडीवर आता टीका होऊ लागली आहे. ज्या वेगाने शिवसेना (UBT) प्रकल्पांचे श्रेय स्वतःकडे घेत आहे,
ते पाहता उद्या ते ‘जागतिक शांतता’ प्रस्थापित करण्याचे श्रेयही स्वतःलाच देतील की काय,” अशी चर्चा आता मुंबईच्या कट्ट्यांवर रंगू लागली आहे.
केवळ होर्डिंगबाजी करून आणि जुन्या कामांवर शिक्का मारून मुंबईचा विकास झाला, असा भास निर्माण करणे आता कठीण झाले आहे,
कारण भाजपने आपल्या डिजिटल कॅम्पेनमधून ‘रिअल-टाइम’ प्रगती आणि भविष्यातील व्हिजन मतदारांसमोर मांडले आहे.
अटेंशन इकॉनॉमिक्स: भाजपची सरशी
आजच्या युगात ज्याच्याकडे लोकांचे लक्ष, त्याचेच राजकारण यशस्वी ठरते. भाजपने हे सूत्र ओळखून लांबलचक भाषणांपेक्षा ‘शेअरेबल’ आणि
‘रिकॉल व्हॅल्यू’ असलेले कंटेंट तयार करण्यावर भर दिला आहे. इन्स्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटस आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून
भाजपचे मेसेज प्रत्येक मुंबईकराच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे विरोधकांचा पारंपारिक प्रचार भाजपच्या या डिजिटल झंझावातासमोर फिका पडत असल्याचे
राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मुंबई महानगरपालिकेची ही लढाई आता केवळ रस्ते आणि नालेसफाईपुरती मर्यादित राहिलेली नाही.
ही लढाई आहे ‘नरेटिव्ह’ची. एकीकडे जुन्या कामांचे श्रेय घेणारी शिवसेना (UBT) आहे, तर दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान,
तरुण पिढीची भाषा आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप घेऊन आलेला भाजप आहे. ‘मार्व्हल’च्या सुपरहिरोजप्रमाणेच
भाजपने मुंबईच्या राजकीय पटलावर आपली पकड घट्ट केली असून, विरोधकांच्या भूलथापांना मुंबईकर बळी पडणार नाहीत,
हेच या निवडणुकीचे मुख्य सूत्र ठरताना दिसत आहे.