MUMBAI LOCAL ACCIDENT: मुंबई उपनगरी रेल्वे सेवेच्या मध्य रेल्वे (MUMBAI LOCAL ACCIDENT) मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला.
TOP NEWS MARATHI | MUMBAI LOCAL RAIL| मुंबईत लोकल अपघात; चूक कुणाची?
अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल ट्रेन्स आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा
एकमेकांना धक्का लागून अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली ट्रॅकवर पडले.
PUNE ACCIDENT: टँकरच्या चाकाखाली चिरडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पुणे शहरात एकच खळबळ
“सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली.
सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले.
त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
त्याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. एकमेकांना त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे ते ट्रेनमधून पडले असावेत.
या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे.
पहिला निर्णय म्हणजे नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील.
238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत.