गुजरात मोरबी पूल दुर्घटना; मृतांचा आकडा 35 वर, पंतप्रधानांनी दुर्घटनेची महिती

400 0

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत कोसळला.या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तर अनेकजण जखमी झाल्याचं स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दलाने आतापर्यंत सुमारे ७० हून अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढलं आहे.

संबंधित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काहींची प्राथमिक तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. यानंतर रविवारी सायंकाळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!