राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच आता राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी समोर आली असून शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या संजय शिरसाठ यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे.
आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील आक्रमक नेते अशी संजय शिरसाट यांची ओळख असून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत केलेल्या बंडावेळी संजय शिरसाठ यांनी एकनाथ शिंदे यांची खंबीर साथ दिली होती.
त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी संजय शिरसाट इच्छुक राहिल्याचही पाहायला मिळालं मात्र छत्रपती संभाजी नगर मधून संदिपान भुमरे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने संजय शिरसाठ यांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या होत्या मात्र आता विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना शिंदेंकडून संजय शिरसाठ यांना मोठे गिफ्ट देण्यात आलंय