Facebook Insta

Meta Server Down: देशभरात फेसबुक आणि इंस्टाग्रामचा सर्व्हर डाऊन

4748 0

मुंबई : जर तुमचे Facebook खाते अचानक काम करणे बंद झाले असेल, तर हे फक्त तुमच्यासोबतच घडत नाही. सर्वत्र META सर्व्हर डाउन झाल्यामुळे संपूर्ण देशभरात हा प्रॉब्लेम झाला आहे.

अचानक फेसबुक, इन्स्टाग्राम बंद झालं आणि संपूर्ण जगभरात गोंधळ उडाला. मेटाचे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद झाल्यामुळे लोक चितेंत पडले नेमकं झालं तरी काय? रिफ्रेश करुनही पुन्हा लॉगिन करता येत नसल्यामुळे लोक X वर आले. लोकांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली. अशातच मार्क जुकरबर्ग यांनी X वर पोस्ट करत लोकांना चील करण्यास सांगितलं.

लोकांना नेमका काय प्रॉब्लेम येत आहे?
जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत.तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील. लॉगआऊट होण्याचा प्रकार इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे.

सध्या फेसबुककडून याच्यावर काम सुरु असून काही लोकांचे फेसबूक सुरु झाले आहेत तर काही लोकांना अजूनही प्रॉब्लेम येत आहे. लवकरच सगळ्यांचे फेसबुक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!