MAYURI BANGAR WALMIK KARAD VIRAL CLIP: मयुरी बाळा बांगर आणि वाल्मीक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

554 0

MAYURI BANGAR,WALMIK KARAD VIRAL CLIP: परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात पुराव्यानिशी माहिती देणारे

विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर आणि वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी टॉप न्यूज मराठी करत नाही..

पाहूयात या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे?

MAYURI BANGAR, WALMIK KARAD AUDIO CLIP: मयुरी बाळा बांगर आणि वाल्मीक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर या सांगत आहेत..

बाळा बांगर मला भेटून गेले नाहीत. कुठे गेले मला माहिती नाही?

मी बाळ बांगर यांच्या आई वडिलांना विचारलं तरी सुद्धा त्यांना देखील माहिती नाही..

त्यावर वाल्मीक कराड म्हणत आहे.. मी स्वतः बाळा बांगरला पुण्यात ऍडमिट केला आहे..

त्यानंतर वाल्मीक कराड सातत्याने बाळा बांगर याच्या विरोधात केलेली पोस्ट डिलिट करण्याची मागणी करत आहे..

त्याचबरोबर मयुरी बांगर म्हणाल्या की मला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात

या कथेत ऑडिओ क्लिप मध्ये मयुरी बांगर यांनी आरोप केला की बाळा बांगर याचे एका मुलीबरोबर संबंध आहेत..

त्यावर वाल्मीक कराड म्हणतोय बाळा बांगर आणि त्या मुलीमध्ये बहिण भावाचे संबंध आहेत..

त्याच बरोबर बाळा बांगर हा तुमच्या पैशाला पाहून तुमच्यासोबत आहे असं मयुरी बांगर सांगत आहे

या ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मीक कराड सातत्याने ती पोस्ट डिलीट करण्याची मागणी करत आहे..

त्याचबरोबर बाळा बांगर याला माझ्यासोबत राहायचं नसेल तर त्याने मला अर्धी प्रॉपर्टी आणि

अर्धी संस्था ताब्यात द्यावी अशी मागणी मयुरी बांगर करत आहे

BEED JAIL PRISONER FOUND MOBILE:वाल्मीक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड कारागृहात कैद्याकडे मोबाईल आढळल्याने खळबळ
काही दिवसांपूर्वीच बाळा बांगर यांना महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते..

त्यानंतर बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर आणि वाल्मीक कराड यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली .

Share This News
error: Content is protected !!