सातारा: अफजलखानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई सुरू आहे.
प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी जेसीबी आणि पोकलेन मशीन तैनात करण्यात आले आहेत. कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. 2017 मध्ये न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश स्थानिक प्रशासन व राज्य सरकारला दिले होते त्यानंतर आता आहे कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून हा शिंदे फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. चार जिल्ह्यातले १५०० हून अधिक पोलीस साताऱ्यात दाखल झाले आहेत.