राज्यपालांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; आजपासून 7 दिवस राज्यभर करणार आंदोलन

214 0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहे.

ठिकठिकाणी राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. तर राज्यपालांना तत्काळ महाराष्ट्रातून परत बोलून घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आजपासून राजकीय नेत्यांच्या घरासमोर शिवभक्तांकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्च्याकडून देण्यात आली आहे.

सहकार मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबादच्या निवासस्थानापासून या आंदोलनाची आजपासून सुरुवात होणार आहे. ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम राबवली जाणार असून, या अंतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!