पुण्यात ज्ञानोबा- तुकोबा माऊलींच्या पालखी निमित्त अनेक रस्ते बंद; बंदर असताना पर्यायी मार्ग कोणते ? वाचा सविस्तर

1090 0

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू झाला असून आज या पालख्यांचे पुण्यात आगमग होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी ही वाहतूक ही वळवण्यात आली आहे. पाहूया पुणे पोलिसां तर्फे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नेमके कोणकोणते बदल करण्यात आले आहेत.

हे रस्ते असणार बंद

बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतूक बंद असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. येरवड्यातील मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक बंद राहणार आहे. तसेच चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद असणार आहे. त्याचबरोबर, नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. पालखी जसजशी आपल्या ठरलेल्या मार्गावरून पुढे सरकेल तसतसे मागचे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातील. त्याचबरोबर पालखी पुढे सरकेल तसे पुढचे रस्तेही बंद केले जातील. अति वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून हे निर्णय घेण्यात आले आहेत.

बंद रस्त्यांना ‘हे’ पर्यायी मार्ग

धानोरी रोडने व अंतर्गत रोड, जेल रोड – विमानतळ रोड मार्गे, पर्णकुटी चौक – गुंजन चौक – जेल रोड – गॅरीसन इंजिनिअरींग चौक – विश्रांतवाडीतील अंतर्गत रस्ते – रेंजहिल्स – खडकी पो.स्टे, अंडरपास पोल्ट्री फार्म चौक- जुना मुंबई – पुणे महामार्ग, रेंजहिल्स – सेनापती बापट रोड, नळ स्टॉप चौक, खंडोजीबाबा चौक, कर्वे रोड, सेनापती बापट रोड – रेंजहिल्स, गाडगीळ पुतळा – कुंभारवेस चौक – आर.टी.ओ. चौक जहांगीर मार्गे, पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल्स मार्गे किंवा औंध मार्गे, घोले टोड व आपटे रोड, कुंभारवेस – पवळे चौक – फडके हौद चौक मालधक्का चौक – नरपतगीर चौक – पंधरा ऑगस्ट चौक कमला नेहरू हॉस्पिटल हे रस्ते खुले असणार आहेत. मात्र काही प्रमाणातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने हे पर्यायी मार्ग सुचवले आहेत. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर एक्स या प्लॅटफॉर्मवर त्या संदर्भातला परिपत्रक जाहीर केल आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!