मुंबई: राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार मनोज सैनिक यांची महारेराच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 मध्ये महारेराच्या अध्यक्षपदी अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 20 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त झाला अजय मेहतांच्या जागी मनोज सैनिक यांना महारेराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.