Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार; आता…

84 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, जालना, या मतदारसंघात उमेदवार देतील अशी शक्यता निर्माण झाली होती या अनुषंगाने अंतरवाली सराटीमध्ये सकल मराठा समाजाचे बैठक देखील बोलवण्यात आली होती.

या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आले असून मनोज जरांगे पाटील यांनी आपण निवडणूक लढणार नाही असं आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं आहे हा निर्णय राजकीय दबावातून घेतला नाही. एका जातीच्या आधारावर निवडणूक असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यासोबतच ही माघार नसून गनिमी कावा आहे असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हणत आपला आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्या 

निवडणूक न लढण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

मनोज जरांगे पाटलांची भूमिका सामंजस्याची 

निवडणूक न लढण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटलांची भूमिका सामंजस्याची असल्याचं म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!