Pune Satara Toll

वाहन चालकांसाठी मोठी बातमी; टोल नियमात मोठेबदल; आता वीस किमी पर्यंत टोल नाही

695 0

नवी दिल्ली:  देशभरात द्रुतगती मार्गांचं (EXPRESSWAY) मोठ्या प्रमाणावर जाळ विणण्यात येत असून ज्याप्रमाणे एक्सप्रेस वे निर्माण होत आहे त्या प्रमाणात वाहतूक नियमातही मोठा बदल केला जातोय.

असाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल प्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे आता हायवे अथवा एक्सप्रेस-वेवर गाडी चालवली तर वीस किलोमीटर पर्यंत कोणताही टोल लागणार नाही आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय शुल्क नियम 2008 मध्ये बदल केला आहे. या नव्या बदलानुसार सरकारनं जीएनएसएस सॅटॅलाइट आधारित टोलप्रणालीला मान्यता दिली आहे. यामुळे वाहन चालकांना टोल नाक्यावर थांबण्याचे देखील गरज राहणार नाही यामुळे वाहन चालकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

रस्त्यावरून २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर जर पुढे प्रवास केला तरच एकूण अंतराचा टोल आकारला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे जीएनएसएस असलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन असणार आहे. या वाहनांना न थांबता टोल नाका पास करता येणार आहे. या वाहनांच्या लेनमध्ये फास्टॅग असणारं वाहन घुसल्यास त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.

जीएनएसएस प्रणाली कसं काम करणार?

जीएनएसएस ही सॅटेलाईट यंत्रणा लागू करण्यात आली आहे. ज्या गाड्यांमध्ये जीएनएसएस असेल त्यांचा टोल या पद्धतीने कापला जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!