Breaking News

जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान

1035 0

मुंबई: जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत?

अप्पासाहेब धर्माधिकारी हे थोर निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिंरजीव होत. वडिलांकडून त्यांना निरूपणाचा वारसा लाभला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवले जातात. त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अप्पासाहेबांना पद्मश्री सन्मानानेही गौरवण्यात आले.

बालसंस्कार शिबिर

समाजाच्या सेवेसाठी अप्पासाहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. गेली ३० वर्षे ते निरुपण करत आहेत. बालमनावर संस्कार करत असतात. त्यासाठी त्यांनी बालसंस्कार बैठकी घेतल्या. त्यातून बालकांवर चांगले संस्कार केले. नव्या पिढीला मार्गदर्शन केले. त्यातून चांगली समाजनिर्मिती झाली.

व्यसनमुक्तीसाठी कार्य

आदिवासी पाड्या, वस्त्या या ठिकाणी त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्य केले. निर्माल्यातून खत निर्मिती केली. त्यातून पर्यावरण पुरक संदेश त्यांनी समाजाला दिला. अप्पासाहेब हे स्वच्छतादूत म्हणून ओळखले जातात. वडील नानासाहेब यांचे कार्य ते जोमाने करत आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!