ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची 65 उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला उमेदवारी?

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे याच पार्श्वभूमीवर आता महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रत्नाकर प्रभाकर गुट्टे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

अजित पवारांच्या विरोधात बारामतीतून संदीप चोपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे यासोबतच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून शैलेश काची तर वडगाव शेरी मतदारसंघातून सतीश पाण्डेय तर कोथरूड मतदारसंघातून सोनाली ससाने यांना उमेदवारी दिली आहे.