पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार सराईत गुन्हेगाराकडून पाच देसी पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
जगताप डेरी परिसरामध्ये असलंम अहमद शेख हा व्यक्ती देशी पिस्टल सारखं हत्यार घेऊन थांबलेला आहे. अशी गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी असलम अहमद शेख ला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्या चौकशी दरम्यान देशी पिस्टल विकणारे सचिन उत्तम महाजन, संतोष विनायक नातू, राहुल उर्फ खंडू गणपत ढवळे या तिन आरोपींना खंडणी विरोधी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच ह्या चारही आरोपीच्या ताब्यातून एकूण पाच देशी पिस्टल आणि दहा राऊंड जप्त केले आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपी पैकी सचिन महाजन, संतोष नातू आणि राहूल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात पुणे शहर l, पुणे ग्रामीण आणि सोलापूर जिल्ह्यात दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, आणि बेकायदा अग्निशास्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत