पुणे: मागील काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अँक्शन मोडवर आला असून पुणे जिल्ह्यात मोठा कारवाईचा धडाका पहायला मिळत आहे.
आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यातील मुळशीत मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल 57 लाख 25 हजार 520 रुपयांचं बेकायदेशीर मद्य जप्त केलं आहे.
या प्रकरणी दानाराम चुनाराम नेहरा, रुखमनाराम खेताराम गोदरा या दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ई), 80, 81, 83, 90, 103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-माणगाव हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही धडक कारवाई केली आहे.