सध्या राज्यभरात चर्चा आहे ती केवळ बहिणींची.. आणि ही चर्चा होण्यामागचं कारण ठरतेय खास बहिणींसाठी आणण्यात आलेली लाडकी बहीण योजना. या योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप अनेक महिला पैसे न मिळाल्याची तक्रार करताना दिसतायत. त्यामुळेच तुम्हाला या योजनेचे पैसे आले नसतील तर तुमच्या अर्जाचं स्टेटस नेमकं काय ? हे तपासणं गरजेचं आहे. हेच स्टेटस तुम्ही घरबसल्या कसं तपासू वाचा सविस्तर.
लाडकी बहीण योजनेचा स्टेटस हे दोन पद्धतीने तपासतात येईल. सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून स्टेटस कसा तपासायचं हे वाचा.
1. सर्वप्रथम स्क्रीनवर दिसत असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. ( https://ladakibahin.maharashtra.gov.in )
2. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल. होम पेजवर मेन्यू बार मध्ये दिलेल्या लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा.
3. त्यानंतर लॉगिनचं पेज दिसेल. त्यावर तुमचा मोबाईल नंबर, फॉर्म भरताना टाकलेला पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
4. आता तुम्ही भरलेला अर्ज दिसेल. त्याच ठिकाणी दिसणाऱ्या स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून किंवा याच पेजवर असलेल्या आय बटनवर क्लिक करूनही तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस पाहू शकता.
नारीशक्ती दूत ॲप
दुसरा पर्याय म्हणजेच नारीशक्ती दूत ॲप वरून स्टेटस कसं तपासायचं हे वाचा.
1. सर्वप्रथम तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
2. आता हे ॲप उघडून त्यात तुमचा मोबाईल नंबर टाकून टर्म्स अँड कंडिशन्सला एक्सेप्ट करा. आणि लॉग इन करा.
3. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाका.
4. यानंतर तुमच्यासमोर नवे पेज जिथे तुम्हाला प्रोफाइलचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
5. त्यानंतर दिसणाऱ्या पेजवर तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा क्रमांक टाका. हा क्रमांक टाकतात तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.
कोणत्या स्टेटसचा अर्थ काय ?
जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. जर स्टेटस पेंडिंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या फॉर्म तपासणीसाठी कोणत्याही अधिकाऱ्यापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. जर स्टेटस रिव्ह्यू मध्ये असेल तर त्याचा अर्थ फॉर्म अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला असून त्याची तपासणी सुरू आहे. आणि जर स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल. तर याचा अर्थ तुमचा फॉर्म ना मंजूर झाला आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे हे तपासून घ्या.