ठाकरे परीवाराविरोधात किरीट सोमय्या आक्रमक! ‘या’ प्रकरणावरून रेवदंडा पोलीस ठाण्यात करणार तक्रार

298 0

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

Share This News
error: Content is protected !!