KEDARNATH HELICOPTER CRASH: केदारनाथधामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत पायलटसह (KEDARNATH HELICOPTER CRASH) सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

KEDARNATH HELICOPTER CRASH: केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं सोन प्रयागच्या जंगलात

270 0

KEDARNATH HELICOPTER CRASH: केदारनाथधामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून,

या दुर्घटनेत पायलटसह (KEDARNATH HELICOPTER CRASH) सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं सोन प्रयागच्या जंगलात

हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यामधील जंगलात कोसळले.
हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 प्रवासी होते.

WHAT IS BLACK BOX:अहमदाबाद विमान दुर्घटनेचं कारण ‘ब्लॅक बॉक्स’ मधून उलगडणार; ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे नेमकं काय

अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरु आहे.

सकाळी साधारण 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे.

Ahemdabad Plane Crash Update : उड्डाण घेतल्यानंतर ‘त्या’ शेवटच्या काही मिनिटात काय घडलं? 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

“जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन, इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात आहेत.

GUJARAT PLANE CRASH IRFAN SHAIKH: ‘ईद साजरी करून गेला, आता कधीच परतणार नाही’;गुजरात विमान दुर्घटनेत पुण्यातील केबिन क्रू इरफान शेख याचा मृत्यू

केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह धामी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!