JAYANT PATIL: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन सोहळा होत आहे. शरद पवारांच्या वर्धापनदिनाच्या
कार्यक्रमादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून JAYANT PATIL:
पक्षाच्या वर्धापनदिनीच प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत, Jayant Patil चं भाषण UNCUT
जयंत पाटलांनी शरद पवारांसमोर भाषणातच दिला राजीनामा देण्याचे सुतोवाच केले आहेत.
मात्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होताना पाहायला मिळत आहे.
तरी देखील राजीनामा देण्याच्या भूमिकेवर जयंत पाटील ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
JAYANT PATIL यांच्याकडे… ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष SUNIL TATKARE यांचं मोठं विधान
आजपर्यंत पवार साहेबांना मला बरीच संधी दिली.
प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे.
त्यामुळे आज तुमच्या सर्वांदेखत मी पवार साहेबांना एवढीच विनंती करेन की, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करावे.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सभागृहात घोषणाबाजी केली.
तेव्हा जयंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना शांत बसण्याचे आवाहन केले.
शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता आपल्याला बरंच पुढे जायचं आहे.
त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या संधीसाठी मी पवार साहेबांचे आभार मानतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले