मालवणमधील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात कंत्राट दारावर आणि पुतळाच्या शिल्पकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर या पुतळ्याचा शिल्पकार आता पोलिसांच्या अटकेत आहे. मात्र ये शिल्पकाराला पुतळा बनवण्यासाठी केवळ 26 लाख रुपये देण्यात आले असून बाकीचे पैसे नारायण राणेंच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप, आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, ‘शिल्पकार जयदीप आपटे याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये देण्यात आले आहेत. बाकीची रक्कम त्याला दिलेली नाही. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तर जिल्हा नियोजन निधीतून 5, 54, 35,000 रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आले. नौसेनेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनच्या पैशातून टाकण्यात आलं. त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना अशा दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने कार्यक्रम केला. त्या कामाच्या पैशातून नारायण राणे यांच्यासाठी निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले. निलेश राणे यांनी पुतळा कोसळला त्यात माझा हात असल्याचा आरोप करत माझ्या विरोधातले पुरावे देतो, असं म्हणाले होते. मात्र आता एक महिना होऊनही पुरावे देऊ शकले नाहीत. माझ्यावर हे आरोप केवळ लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडून दुसरीकडे वळवण्यासाठी केले गेले.’
आमदार वैभव नाईक यांनी राणे पिता-पुत्रांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यारो पण ना आता राणेंकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असून या पुतळ्याच्या कामात खरंच भ्रष्टाचार झाला आहे का ? याचा तपास केला जाणार आहे.