नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने शनिवारी रात्री 12:07 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले.
#WATCH | ISRO launches LVM3-M2/OneWeb India-1 Mission from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota
(Source: ISRO) pic.twitter.com/eBcqKrsCXn
— ANI (@ANI) October 22, 2022
इस्रोने एकाच वेळी 36 उपग्रह प्रक्षेपित केले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रोच्या एलव्हीएम-3 रॉकेटने वनवेब या खाजगी संप्रेषण कंपनीचे 36 उपग्रह वाहून नेले. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत LVM-3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल. 36 पैकी 16 उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले असून उर्वरित 20 उपग्रह वेगळे केले जातील.
LVM3 M2/OneWeb India-1 mission is completed successfully. All the 36 satellites have been placed into intended orbits: Indian Space Research Organisation
— ANI (@ANI) October 22, 2022