ब्रेकिंग न्यूज, उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचे निधन

553 0

पुणे- प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपास आणण्यास राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना 2001 साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राहुल बजाज राज्यसभेचे सदस्य देखील होते. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.

राहुल बजाज सन 1968 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर 30 व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘ बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत: ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष 1965 मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन 2008 मध्ये बजाजने सुमारे 10 हजार कोटींची उलाढाल गाठली .

पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल बजाज यांच्यानंतर 67 वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide