IAS पूजा खेडकर नॉट रिचेबल; अटकेच्या भीतीने मोबाईल बंद केला असल्याची शक्यता

457 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात येऊन पुण्यातल्या निवासस्थानी असलेल्या सोसायटीमध्येच पुणे पोलिसांना आपला जबाब नोंदवून दिला होता. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात येणे अपेक्षित होते मात्र त्या तिथे आल्या नाहीत. त्यानंतर मात्र पूजा खेडकर या नॉट रिचेबल असून पुणे पोलीस त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या विरोधात मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी दोन वेळा त्यांना नोटीस पाठवली मात्र तरीदेखील त्या उपस्थित राहिल्या नाहीत. अखेर पुण्यातील घरी त्यांनी पोलिसांसमोर जबाब नोंदवला. मात्र त्यानंतर त्यांच्याशी पोलिसांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान पूजा खेडकर यांच्या विरोधात खोटे दिव्यांग प्रमाणपत्र यूपीएससी ला सादर केल्या प्रकरणी दिल्ली क्राइम ब्रँचने गुन्हा नोंद केला असून त्या प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. क्राईम ब्रँच कडून अटक होण्याची शक्यता असल्याने खेडकर या नॉट रिचेबल झाल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मसुरी प्रशिक्षण संस्थेत हजर राहण्याचे आदेश

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, ओबीसी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी पूजा खेळकर यांच्यावर कारवाई झाली असून त्यांचे महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. तर 23 जुलै पर्यंत त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नॉट रिचेबल असलेल्या पूजा खेडकर मसूरी मध्ये तरी हजर राहतात का ? याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!