मी पुन्हा आलो आणि सोबत एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

281 0

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आजचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. 

या अधिवेशनात 164 आमदारांचे बहुमत मिळवत शिंदे सरकारनं हा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहाला संबोधित करताना मी पुन्हा आलो आणि सोबत एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याच बरोबर शिंदे हे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करतील असा विश्वास देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!