पुण्यासह राज्यात या आठवड्यात कसा असेल पाऊस ?

355 0

महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल मात्र त्यात म्हणावा इतका जोर असणार नाही. पुण्यात पुढील काही दिवसांत हलक्या सरी बरसतील. अंशतः ढगाळ ते सर्वसाधारणपणे ढगाळ, असं वातावरण कायम राहील.

महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये किमान 4 ऑगस्टपर्यंत मान्सूनची स्थिती काहीशी विस्कळीत स्वरुपाची असेल, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसानंतर आता कोकणासह राज्याच्या विविध भागात पुढील एका आठवड्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात 28 जुलै पर्यंत या सामान्य किंवा किंचित कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुलैच्या सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस न झालेल्या देशातील सर्व प्रदेशांमध्ये आता काही प्रमाणात जोरदार ते
खूप जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये वायव्य भारतातील प्रदेशांचाही समावेश आहे.

सरासरी समुद्रसपाटीवरील मान्सून उत्तरेकडे सरकला आहे
आणि आता तो त्याच्या सामान्य स्थितीजवळ आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरला आहे.

Share This News
error: Content is protected !!