पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणारं नवीन संसद भवन आहे तरी कसं ?

596 0

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसदेचा आज लोकार्पण होत असून दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संसदेतून संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत

८८८ सदस्यांची आसन व्यवस्था असलेल्या नव्या लोकसभेत हा समारंभ होईल.

या सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि राज्यसभेचे उपसभापती हरीवंश उपस्थित राहणार आहेतसर्व देशांचे राजदूत, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह इमारतीच्या बांधकामात योगदान असलेले रतन टाटा, नव्या इमारतीचे वास्तुशिल्पी बिमल पटेल, मान्यवर खेळाडू, चित्रपट कलावंत व विविध क्षेत्रांतील मान्यवरांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाच्या वतीने निमंत्रण पाठविले आहे.

या कार्यक्रमात लोकसभाध्यक्षांचे भाषण होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!