काय अजित पवार कसं वाटलं जबरदस्तीनं आरती करताना ? निलेश राणेंचा खोचक टोला

221 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता विविध पक्षांकडून मनसेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली. त्यानंतर सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती करण्यात आली.

 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. यावेळी प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसा म्हणली, तर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली. यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Share This News
error: Content is protected !!