उषा काकडे यांचे सख्खे भाऊ बांधकाम व्यवसाईक युवराज ढमाले यांना त्यांचे सख्खे मेव्हणे संजय काकडे व बहीण उषा काकडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमधे कलम ५०६,५०६(२),५००,५०४,३४ अन्वये दिनांक ०१/०८/२०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार न्यायालयाने दोघा पती पत्नी ला जामीन देऊन काही अटी व शर्ती वर सोडले होते नंतर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन आरोपपत्र (चार्जशीट) न्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यावर उषा काकडे यांनी स्वतःपुरते या केस मधून डिस्चार्ज अर्ज केला होता संमंधित प्रथमवर्ग न्यायाधीश कोर्टाने त्यांचा डिस्चार्ज अर्ज फेटाळला व त्यानंतर
उषा काकडे यांनी प्रथमवर्ग न्यायाधीश कोर्टाच्या आदेशा विरुध्द सेशन कोर्टात अपील केले व त्यावर सेशन कोर्टाने उषा काकडे यांचा डिस्चार्ज अपील मंजूर केला होता. त्यावर ढमाले यांनी सेशन कोर्टाच्या आदेशा वर मुंबई हायकोर्ट मधे अपील केले होते त्यावर हायकोर्टाने सुनावणी घेऊन दोन्ही बाजूच्या वकीलांनी न्यायालयासमोर बाजू मांडली त्यामधे ढमाले यांच्या वकीलांनी सदर केस मधे तीन साक्षीदारानी कलम १६४ नुसार न्यायालयाच्या समोर येऊन संजय काकडे व उषा काकडे यांच्या विरोधात साक्ष दिली व ढमाले हे मूळ फिर्यादी असल्याने त्त्यांना कोणतीही नोटीस दिली नाही त्यांचे म्हणणे ऐकले नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर उच्च न्यायालयाने यापूर्वीचे सेशन न्यायालयाचे निकाल रद्द करुन सदर केस पुन्हा सेशन न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले त्यामुळे उषा काकडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसते. उषा काकडे यांच्या वतीने अॅड सतीश मानेशिंदे , अॅड हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली व ढमाले यांच्या वतीने अॅड अबाद पोंडा, अॅड सत्यव्रत जोशी, अॅड निलेश त्रिभुवन यांनी बाजू मांडली.