जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला: पहलकांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

1713 0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम शहरात दहशतवादी हल्ला झाला असून टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे.

दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन महाराष्ट्रीयन पर्यटकांची नावे आहेत. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पोलिसांचा वेश परिधान केला होता.

हल्ल्यानंतर, पर्यटकांना मदत आणि माहिती देण्यासाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 9596777669, 01932225870 (9419051940 व्हाट्सअप) हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!