तोच खरा वारसदार….; अभिनेता केदार शिंदेच ट्विट चर्चेत

364 0

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताहेत यामुळे सध्याचे राजकारण हा सगळीकडेच चर्चांचा विषय आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेल्या सध्याच्या ट्विटमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावर आपल्या ठाम आणि परखड भूमिकेबद्दल केदार शिंदे हे नेहमीच ओळखले जातात. यापूर्वी देखील त्यांनी अनेक राजकीय, अराजकीय गोष्टींवर दिलेल्या प्रतिक्रियांची चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या आताच्या ट्विटची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आपल्या ट्विटमध्ये केदार शिंदे म्हणतात की, व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा, तो सांभाळतो, तोच खरा वारसदार…. शिंदे यांच्या या सुचक प्रतिक्रियेला नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Share This News
error: Content is protected !!